प्रतिनिधी | निंभोरा
निंभोरा येथील कृषी तंत्र विद्यालय येथे विद्यालयाच्या अभ्यासक्रमात असलेल्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी रावेर तालुका कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक सचिन गायकवाड आले असता विद्यार्थ्यांना त्यांनी विविध शासकीय कृषी योजनांची माहिती सविस्तर समजावून सांगितली त्यात प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री किसान सन्मान योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना, फळ प्रक्रिया उद्योग तसेच यांत्रिकीकरणांमध्ये मिळत असलेले अनुदान व सवलती, ठिबक व तुषार सिंचन योजना, फळबाग लागवड योजना, स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना तसेच मागेल त्याला शेततळे ही योजना व शेतीपूरक स्वयंरोजगार याबाबतीत देखील सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच कृषी विभागाचे कृषी पर्यवेक्षक सतीश तायडे यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे राजेंद्र कोंडे यांनी हवामान आधारित प्रधानमंत्री फळपीक विमा योजनेची सविस्तर माहिती दिली तसेच कृषी विभागाच्या प्रीती सरोदे यांनी शेती क्षेत्रात महिलांचा सहभाग याबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश स्कूल निंभोरा येथील प्राचार्य टीकाराम बोरोले होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात "कृषी क्षेत्राला भविष्यामध्ये सुवर्णकाळ येणार तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या कामांमध्ये नियमितता व सातत्य ठेवल्यास यश आपल्याला हमखास मिळते." असे वक्तव्य केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निंभोरा येथील प्रगतिशील शेतकरी हिरामण बोंडे तसेच न्यू इंग्लिश स्कूल व जुनिअर कॉलेजचे प्राध्यापक योगेश नेमाडे, विद्यालयाचे प्राचार्य मोहन भंगाळे, जितेंद्र भावसार उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्र संचलन विवेक बोंडे यांनी तर आभार प्रदर्शन धनराज बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जितेंद्र कोळंबे यांचे अनमोल सहकार्य लाभले या कार्यक्रमास प्रथम व द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.














إرسال تعليق