प्रतिनिधी | बलवाडी
तांदलवाडी ता.रावेर येथील रहिवासी सुनील दशरथ पाटील यांनी ऑर्डर केलेल्या मोबाइल बॉक्स मध्ये साबण आढळून आल्यानंतर त्यांनी सर्व बाजुंनी प्रयत्न सुरू केले असता प्रत्येक ठिकाणी त्यांच्या पदरी निराशाच येत होती मग पाटील यांनी निंभोरा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत आपबिती पोलीस स्टेशन चे सहा. पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांना सांगितली.
![]() |
| चोरट्या डिलेवरी बॉय कडून जप्त केलेल्या वस्तू |
त्यानंतर स.पो.नी. बोचरे यांनी लगेचच गुन्हा दाखल करीत आपले सहकारी सुरेश अढायके, यांच्या सोबत प्रकरणाचा तपास सुरू केला आणि अवघ्या काही तासातच गहाड झालेला मोबाईल फोन शोधून काढला.
डिलिव्हरी बॉय रुकेश तुकाराम पाटील रा. कडगाव ता. जि. जळगांव याला तपासासाठी बोलाविले असता त्याने कबुल केले की मीच मोबाईल खोक्यात साबण भरून दिले होते. पोलिसी भाषेत अधिक विचारपूस करता असे आढळून आले की, हा या अगोदर सुद्धा बऱ्याच वेळा कंपनी किंवा ग्राहकांना फसवणूक करत होता.
डिलिव्हरी बॉय रुकेश पाटील यांचे कडून ऑल इन वन टीव्ही, वन प्लस कंपनीचा मोबाईल, प्युमा शूज, हेडफोन, शावमी कंपनीचा मोबाईल, नारझो कंपनीचा मोबाईल आदी रुपये ५२,७४८ किंमतीच्या वस्तू जप्त करीत त्याला अटक करण्यात आली आहे.
एक साधारण कुटुंबातील व्यक्तीला न्याय मिळाल्याने त्यांनी व त्यांच्या परिवाराने पोलीस निरीक्षक बोचरे व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. या प्रकरणामुळे पोलिसांची कार्यतत्परता पुन्हा एकदा समोर आली असून फार मोठे ऑनलाइन फसवणुकीचे रॅकेट उघडकिस आले आहे. सर्वत्र निंभोरा पोलीसांचे कौतुक होत आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.














إرسال تعليق