प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
रावेर तालुक्यातील चिनावल येथे राज्यात बंदी असलेला १ लाख ६१ हजार १०५ रूपयांचा विमल गुटख्यासह तीन मोटर सायकली सावदा पोलिसांनी जप्त केल्या. या घटनेने गुटखा तस्कर व विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, रावेर तालुक्यातील सावदा येथून जवळच असलेल्या चिनावल शिवारात चिनावल – उटखेडा रस्त्यावरील सुकी नदी पुलावर राज्यात बंदी असलेल्या गुटख्याची तस्करी करीत असताना रोझोदा येथील ३७ वर्षीय अजय शांताराम कोळी, चिनावल येथील २७ वर्षीय यश उर्फ योगेश पितांबर चौधरी, चिनावल. व लोहारा येथील २९ वर्षीय अस्लम सलीम तडवी सर्व तालुका रावेर येथील रहिवासी यांना पकडुन त्यांची चौकशी केली असता त्याच्या कडून आरोग्यास अपायकारक असलेला सुगंधित केसर युक्त विमल पान मसाला गुटखा व तंबाखू जन्य गुटखा मिळुन आल्याने पोलिसांनी १ लाख ६१ हजार १०५ रुपयांच्या गुटख्यासह तीन दुचाक्या जप्त केल्या.
या संदर्भात वरील तालुका रावेर तेथील तीनही गुन्हेगार यांना अटक करून त्यांच्यावर सावदा पोलिस स्टेशनला हे का. निलेश बाविस्कर यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई सपोनी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोउ निरीक्षक अमोल गर्जे सह पोलीस कर्मचारी करीत आहेत.
सावदा तथा परिसरात सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा विक्री सुरूच आहे. सर्वत्र खुलेआम अवैध गुटखा विक्री व तस्करी सर्रास सुरूच असून अन्न औषध प्रशासन मात्र या कडे दुर्लक्ष्य करीत असल्याची ओरड होत आहे. कित्येकदा कारवाया होतांना दिसतात मात्र, त्यानंतरही त्यांची आवक व विक्री बंद होताना दिसतच नाही. जिल्ह्यात शहरच नव्हे, तर ग्रामीण परिसरात गुटखा विक्री सर्रासपणे पानटपरी, दुकानांमध्ये होत आहे. गुटखा विक्रीसाठी व्यापाऱ्यांची मोठी साखळी कार्यरत आहे. ती तोडण्यासाठी कठोर कारवायांची गरज आहे.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.














إرسال تعليق