प्रतिनिधी | निंभोरा
येथे दि. १५ जानेवारी रोजी संजीवनी ब्लड सेंटर व डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने निंभोरा ता. रावेर येथे रेणुका माता मंदिरात रक्तदान शिबिर पार पाडले. अध्यक्षीय मनोगतात सरपंच निर्मला कोळी यांनी तरुणांमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजवणे ही काळाची गरज आहे असे विचार व्यक्त केले.
राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा दिनानिमित्त निंभोरा येथे डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी शिवनेरी माने, आचल राजरवाल, सपना राठोड, विजया वराडे यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत "रक्तदान ही आजच्या काळाची गरज आहे अनेकदा वेळेवर रक्त मिळत नसल्याने मृत्यू होण्याच्या घटना कानावर येतात त्यामुळे तरुणाईने अधिकाधिक रक्तदान करावे" असे आवाहन या युतीने केले.
डॉ. एस. डी. चौधरी, परमानंद शेलोडे आणि जितेंद्र चौधरी यांचा सहकार्याने या उपक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या वेळेस निंभोरा पोलिस स्टेशन चे स.पो.नी. हरिदास बोचरे, संजीवनी ब्लड सेंटर चे प्रमुख डॉ. प्रशांत सोनवने, नितिन इंगळे, वैद्यकीय अधिकारी कांचन नेहते, निंभोरा सरपंच श्रीमती निर्मला कोळी, साई कृषितंत्र विद्यालयाचे संचालक मोहन भंगाळे व इतर शिक्षक कर्मचारी प्रा. डी. एच. बावस्कर, प्रा.विवेक बोंडे, प्रा. जितेंद्र बावस्कर, प्रा. जितेंद्र कोळंबे आणि पत्रकार राजीव बोरसे, दस्तगीर खाटीक, सुनील कोंडे, दिलीप सोनवणे, संदीप महाले उपस्थित होते.
गावातील हिमांशु जितेन्द्र चौधरी यांनी प्रथमच रक्तदान करून कार्यक्रमाला सुरुवात केली. शिबिरामध्ये गावातील युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष देण्यासाठी आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पथक सज्ज होते. रक्तदान शिबिर आयोजित करण्यात मदतीसाठी स्थानिक व राजकीय स्वयंसेवक उपस्थित होते. शिबिरामध्ये रक्तदान करणारे व्यक्तींसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये अल्पोपहाराची व्यवस्था केली होती.
रक्तदान करत असताना रुग्णांना चक्कर आल्यास आरोग्य केंद्राने विश्रांतीसाठी विशेष व्यवस्था केली होती. कृषी महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. व्ही. एस. पाटील, गाव समन्वयक प्रा. ए. आर सोहनी यांच्या मार्गदर्शन अंतर्गत रक्तदान शिबिर यशस्वी झाले.
येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.













إرسال تعليق