प्रतिनिधी : राहुल चौधरी | प्रदीप कुळकर्णी
आज सावदा येथे वीज चोरी प्रकरणी कडक कारवाई ची मोहीम मुंबईचे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. चे कार्यकारी संचालक (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर) यांनी पूर्ण जळगाव सर्कल साठी मोहीम राबविली असून यात चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, नगरदेवळा येथील टीम द्वारे कारवाई करण्यात आली. याचप्रमाणे आज रावेर, यावल तालुक्यात एकाच दिवशी ही कारवाई करण्यात आली.
यामध्ये सावदा, कोचूर, रोझोदा, मस्कावद, निंभोरा, थोरगव्हाण, उदळी, गहूखेडा याठिकाणी एकूण २०५ वीज ग्राहकांचे मीटर चेक केले त्यात ७७ वीज ग्राहकांनी चोरी केल्याचे आधळून आले असून त्यांचेवर भारतीय विद्युत कायदा 2003 चे कलम 135 प्रमाणे ही कारवाई करण्यात आली.
सदरील वीज चोरीची कार्यवाही टाळण्यासाठी सर्व ग्राहकांनी वीज चोरी न करता विजेचे देयक (बिल) नियमित भरावे, ज्या ग्राहकांकडे वीज जोडणी (कनेक्शन) नसेल त्यांना नवीन वीज जोडणी दिले जात आहे. तसेच ज्या नागरिकांची वीज देयक भरण्याची तयारी नसेल अशांनी लवकरात लवकर भारत सरकारच्या "छतावर सोलार- मोफत वीज" या योजने अंतर्गत घरावरील छतावर सोलर सिस्टिम बसवून घ्यावे आणि सूर्या पासून आपल्या घरीच तयार होणाऱ्या विजेचा मनमुराद वापर करावा. असे आवाहन उपकार्यकारी अभियंता डी. आर. कोल्हे, सावदा यांनी केले आहे.
येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.













إرسال تعليق