पुण्यस्मरण जाहीरात खाली पहा
प्रतिनिधी : राहुल चौधरी | प्रदीप कुळकर्णी
खिरोदा ता. रावेर येथील धनाजी नाना विदयालय व कनिष्ठ महाविदयालयात समता फ़ाउंडेशनच्या वतीने ड्रेस डिझायनिंग, टेलरिंग प्रशिक्षण वर्ग चालविण्यात येतो. त्यानिमित्त समता फाउंडेशन मार्फत गरजू महिलांना व विद्यार्थिनीना यावर्षी १० शिलाई मशिन व १० खुर्च्याचे वाटप कार्यक्रम जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष कुमार चौधरी व प्रमुख अतिथी युवा नेते धनंजय चौधरी यांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी विदयालयाच्या मुख्याध्यापिका मनिषा महाजन, पर्यवेक्षक एस. पी. चौधरी, रोहिणी चौधरी, फाउंडेशनचे विजय तायडे, शिवणक्लास ड्रेस डिझाईंनिग कोर्सच्या समन्वयिका आशा तडवी, राजरत्न वानखेडे व परिसरातील शिवणक्लासच्या विदयार्थीनी यांची उपस्थिती होती.
सुरुवातीला मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांनी सर्व मान्यवराचे स्वागत केले. महिला स्वावलंबी होऊन घरकामासोबत कुटुंबाला व्यवसायातून हातभार लागावा यासाठी हा उपक्रम माजी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नातून आपल्या परिसरातील महिला व युवतीसांठी सुरु केला असल्याची माहिती मुख्याध्यापिका मनीषा महाजन यांनी प्रास्ताविकातून सांगितली.
त्यानंतर युवानेते धनंजय चौधरी यांनी विदयालयात सुरू असलेल्या समता फाऊंडेशनच्या मोफत ड्रेस डिझायनिंग व शिवणक्लास वर्गातील उपक्रमाचे कौतुक केले. गरजू महिला व शाळेतील गरीब होतकरु विदयार्थीनींना दरवर्षी फाउंडेशनच्या माध्यमातून शिलाई मशिनचे वाटप करण्यात येते. त्यामुळे परिसरातील महिला, शाळेच्या माजी विद्यार्थिनी यांना याचा लाभ मिळत आहे. शाळेतील विदयार्थीनी, खिरोदा, रोझोदा, सावखेडा, जानोरी परिसरातील माजी विदयार्थींनी व महिला यांनी आतापर्यंत दोन हजार तीनशे पेक्षा अधिक लाभार्थींनी याचा लाभ घेतला असल्याची माहिती जाणून अध्यक्ष कुमार चौधरी यांनी समाधान व्यक्त करीत उपक्रमाच्या पुढील वाटचालीसाठी समता फाउंडेशन व समन्वयिका यांना शुभेच्छा दिल्या. आभार पर्यवेक्षक एस. पी. चौधरी यांनी मानले.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

















إرسال تعليق