महादेवांच्या मुकूटाची गावातून टाळ मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणुक "क" वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
प्रतिनिधी | बलवाडी
रावेर तालुक्यातील दसनूर या गावी सुकी नदीकाठावर प्राचीन उमेश्वर महादेवाचे मंदीर आहे. महाशिवरात्रीनिमित्त या मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सुमारे आठशे वर्षापूर्वीचे हे प्राचीन मंदिर असल्याचा इतिहास आहे. पंचक्रोशितील स्वयंभू शिवलिंग असून भक्तांची मनोकामना पूर्ण करणारे असल्यामुळे येथे हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात.
महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान महादेवांच्या मुकूटाची गावातून टाळ मृदंगाच्या गजरात भव्य मिरवणुक काढण्यात आली. प्रसंगी निंभोरा पोलिस स्टेशन चे स पो नी हरिदास बोचरे यानी महादेवाचे व मुकुटाचे दर्शन घेतले. मिरवणूकीनंतर स्वयंभू पिंडीवर हा मुकूट चढवला ग़ेला. तसेच त्यानंतर महादेव मंदिरात रात्रीे महाशिवरात्रीच्या जागराचे भजने झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश्वर महादेव संस्थानचे सर्व संचालक, भजनी मंडळ, गावकरीनी परिश्रम घेतले.
अशी आहे अख्यायिका
सुमारे ८०० वर्षापूर्वी येथे एका भक्ताला साक्षात्कार झाल्याचे समजते, ती जागा साफ करीत असतांना पिंडाला फावडे लागले त्यातून पाणी व रक्ताच्या धारा निघाल्या होत्या हि पिंड येथून खोदून गावात स्थापित करण्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला असता पिंड खोदतांना जमिनीखालचे पाणी लागले मात्र पिंडीचा अंत लागला नाही. हि पिंड जमिनीतून निघाली असून हे प्राचीन मंदिर अष्टपैलू आहे. पूर्वी हे बांधकाम मातीचे व दगडाचे होते. आज त्याला बाहयरूप नवीन दिले आहे.
"क" वर्ग तीर्थक्षेत्र
दसनूर गावातील उमेश्वर महादेव मंदिराला 'क' वर्ग तीर्थक्षेत्राची मान्यता मिळाली आहे. भक्तांसाठी भक्तनिवासाची उभारणी करण्यात आली आहे. ३० वर्षापासून मंदिरात भागवत सप्ताह, भजन, कीर्तन, अखंड हरिनाम सप्ताह तसेच सकाळी व संध्याकाळी हरिपाठ, पंचपदी भजन होते. कार्तिक महिन्यात पहाटे कार्तिक स्नान, गावातून काकडा आरती व दिंडी काढली जाते. या प्राचीन मंदिररावर दर सोमवारीही दर्शनासाठी परिसरातील अनेक भाविक भक्तगण येत असतात.
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
















إرسال تعليق