Khandesh Darpan 24x7

बलवाडी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे शानदार आयोजन



प्रतिनिधी | बलवाडी  


•विद्यार्थ्यांनी प्रश्न मंजुषेद्वारे विचारलेल्या प्रश्नांची दिली उत्तरे.

•• प्रदर्शनात पंधरा विज्ञान उपकरणांची केली होती मांडणी.

•• विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व संस्थाचालकांनी प्रदर्शनात घेतला उत्साहात सहभाग.

•• दोन गटात प्रथम तीन क्रमांकांची झाली निवड.




बलवाडी ता. रावेर येथील श्री बाजीराव नाना पाटील टेक्नि. माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिना निमित्त शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. सरस्वती पूजन व डॉ सी. व्ही. रामण यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे अध्यक्ष गोपाल पाटील यांनी केले. 



संस्थेचे चेअरमन विनोद पाटील यांनी विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन फीत कापून केले. दीपप्रज्वलन संस्थेचे सचिव गोपाल पाटील, मुख्याध्यापक एन. व्ही. पाटील, संचालक रा. सी. महाजन, विनायक पाटील, बी. बी. चौधरी यांनी केले. प्रदर्शनात पंधरा उपकरणांची मांडणी करण्यात आली होती.  प्रास्ताविक व विज्ञान प्रदर्शनाचे महत्व राहुल येवले यांनी सांगितले. विद्यार्थांतर्फे सुदर्शन पाटील, वेदिका जैन, विनीत चौधरी यांनी विज्ञान विषयावर भाषण केले तर मुख्याध्यापक एन. व्ही. पाटील, चेअरमन विनोद पाटील, संचालक विनायक पाटील, रा. सि. महाजन, बी. के. येवले, सौ. रीता चौधरी यांनी विज्ञानाचे आपल्या दैनंदिन जीवनात कसं महत्त्व आहे याविषयी सविस्तर वृत्तांत सांगितला. 


अध्यक्षीय भाषणात गोपाल पाटील यांनी विज्ञान प्रदर्शनाने संशोधन करण्याची वृत्ती निर्माण होऊन चांगले संशोधक होऊ शकतात असे विचार मांडले. शेवटी विज्ञान गीत कु. मितल महाजन, कु. विभूषा पाटील, कु. मीनाक्षी महाजन यांनी सादर केले. आभार कु. मोक्षदा चौधरी सूत्रसंचालन कु. संजीवनी इंगळे यांनी केले. यावेळी व्ही. टी. चौधरी, मयुर पाटील, सौ तेजल महाजन, सौ रोशनी पाटील, अक्षय चौधरी, बंडु तायडे, गोपाल पाटील, सुनील तायडे, राजेंद्र चौधरी यासह सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनींनी परिश्रम घेतलेत.


व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा. 



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  

येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 





Post a Comment

أحدث أقدم