Khandesh Darpan 24x7

रमजान महिन्याचे महत्त्व आणि उपवास कसे ठेवावे ....



खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा 


रमजान 2025 चा पवित्र महिना भारतात आज पासून सुरू होत आहे, हा इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना आहे, जो मुस्लिम समुदायाद्वारे खूप खास मानला जातो.  रमजानमध्ये उपवास कसा ठेवायचा आणि त्याचे महत्त्व काय आहे.



रमजान (अरबी: رَمَضَان, Ramaḍān) हा इस्लामी दिनदर्शिका नववा (९) महिना आहे आणि ज्या महिन्यात कुराण इस्लामी संदेष्टा मुहम्मद यांना अवतरले आहे. रमजान महिन्यातील उपवास हा इस्लामच्या पाच स्तंभांपैकी एक आहे. हा महिना मुस्लिम लोक पहाटेपासून सूर्यास्तापर्यंत दिवसाच्या प्रकाशात उपवास करून घालवतात.



मुस्लीम बांधवांच्या उपवासाच महिन्याला प्रारंभ झाला आहे. यालाच ‘रमजान’चा अर्थात ‘बरकती’चा महिना म्हणतात. मनामनातील दरी कमी करून परस्परांमध्ये स्नेहभाव, सद्भाव वाढविणारा हा महिना. संयम, त्याग, शांती, सहिष्णुता, चांगुलपणा, प्रामाणिकपणा माणसांच्या ठायी रुजविणारा हा महिना. माणसाला वाईटापासून, वासनेपासून शेकडो मैल दूर ठेवणारा हा महिना. या महिन्याचे महात्म्य, पावित्र्य सांगावे तेवढे थोडेच.




या महिन्यातच हजरत मुहम्मद पैगंबरांना त्यांच्या अखंड साधनेचे, खडतर तपश्चर्येचे फळ प्राप्त झाले. अर्थात त्यांना अल्लाहचे दर्शन झाले. ज्या परमेश्वराच्या साक्षात्कारासाठी हजरत मुहम्मद पैगंबरांनी तहान, भूक, दुनियादारी या सार्‍या गोष्टींना तिलांजली देऊन परमेश्वराची इमानेइतबारे इबादत केली, तो परमेश्वर याच महिन्यात त्यांना प्रसन्न झाला. त्यांची ईशसेवा खर्‍या अर्थाने कबूल झाली.



रमजानमधील रोजा म्हणजे सहरीपासून इफ्तारपर्यंत निव्वळ अन्न-पाण्यापासून दूर राहून भुकेची जीवघेणी यातना सहन करणे एवढेच नव्हे तर आखून देण्यात आलेली कुंपणे, बंधने, मर्यादा यांचे तंतोतंत पालन या महिन्याच्या वतरुळात राहून करणे होय. या महिन्यातील बंद्याची इबादत अल्लाहला अधिक पसंत असते. या महिन्यातल्या इबादतीचा असर, नूर काही वेगळाच असतो.



अनीती, अनाचार, अत्याचार, अवास्तव या गोष्टींकडे कानाडोळा करून दुनिेयेतल्या चांगुलपणावर, मांगल्यावर अंत:करणपूर्वक प्रेम करणे, डोळ्यात पावित्र्य साठविणे, मनात नीतिमूल्यांची जपणूक करणे, परोपकाराची भावना रुजविणे, कानांना फक्त चांगले, उदात्त, विधायक विचार ऐकण्याची सवय लावणे ही या महिन्याची विशेष शिकवणूक. महिनाभराच्या त्यागाने, शुद्ध आचरणाने तावून सुलाखून निघालेल्या रोजदारांनी ईदचा शिरकुर्मा आनंदाने प्यायचा असतो. ईद म्हणजे आनंदोत्सवच. जो एकमेकांच्या शुभेच्छांनी, सदिच्छांनी साजरा करायचा असतो.



आमच्या सर्व वाचकांना रमजान महिन्याच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा ...



या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 





सहप्रायोजक आहे.  

येथे आपली जाहिरात पहा अगदी वाजवी दरात 

पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

 





Post a Comment

أحدث أقدم