प्रतिनिधी : राहुल चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथील इत्तेहाद एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू हायस्कूलने २०२५ च्या दहावीच्या (एस.एस.सी.) परीक्षेत ९५.३८% यशस्वी निकाल प्राप्त करून पुन्हा एकदा आपली शैक्षणिक उत्कृष्टता सिद्ध केली आहे. या यशाबद्दल शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे आणि व्यवस्थापनाचे मनःपूर्वक अभिनंदन !
पहिले पाच यशस्वी विद्यार्थी:
१) रिझवान खान वसीम खान कुरैशी याने ८४ % गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकाविला.
२) मिस्बाह परवीन शेख अरशद हिने ८३.६० % गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकाविला.
३) सुफियान शाह आबिद शाह याने ८३.२० % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकाविला.
तर
४) सिफाना परवीन शेख अनीस हिने ८१.८० % गुण मिळवून चौथा क्रमांक पटकाविला.
५) अरबिना मोहम्मद इरफान हिने ८१.६० % गुण मिळवून पाचवा क्रमांक पटकाविला आहे.
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या यशात मोलाचा वाटा उचलला आहे.
याप्रसंगी शाळेचे अध्यक्ष अकबर खान अमानउल्ला खान, उपाध्यक्ष शेख इक्बाल शेख कादर, सचिव अब्दुल अजीज अब्दुल रशीद, सह सचिव अकरम खान अमानउल्ला खान, खजिनदार शेख रफिक शेख गुलाब व सर्व संचालक मंडळ यांनी आमच्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! तुमच्या या यशाने आम्हाला अभिमान वाटतो. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!" शाळेचा ठाम विश्वास : “शिक्षणाने प्रगती, प्रगतीने समृद्धी!”
या यशाबद्दल शाळा प्रशासनाने शिक्षक आणि पालकांचेही विशेष आभार मानले सावदा येथील ही शाळा नेहमीच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे.
या बातमीचे प्रायोजक आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





















Post a Comment