Khandesh Darpan 24x7

सावदा परिसरात अवकाळी पावसाने केळी बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान






प्रतिनिधी :  राहुल  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


काल दि. ०६ रोजी संध्याकाळी झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे केळी बागायतीचे खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  संध्याकाळी ६:३० ते रात्री ८ या दीड तासात सावदा तसेच परिसरात सोसाट्याचा वादळी वारा तसेच विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत ४३ अंश तापमानात कमालीचा थंडावा निर्माण केला खरा, पण केळी उत्पादक बागायतदार शेतकऱ्याच्या केळी बागायतीचे खूप नुकसान झाले. 




सावदा शहरा लगतचे रणगाव, रायपुर, तासखेडा, सुदगाव, गहुखेडा परिसरातील केळी उत्पादक बागायतदार शेतकऱ्याची केळी आडवी झाल्याने जवळपास ४० ते ४५ टक्के नुकसान झाले. या परिसरात जवळपास ३५ लाख केळी रोप तथा कंद लागवड आहे. 



परिसरातील काहीच्या घरावरील, गोठ्यांवरील पत्रे उडून नुकसान झाले. निंबाची झाडे, विजेचे खांब आडवे झाल्याने खूप मोठी हानी झाली. या भागात आजतागायत विजेचा वापर सुरळीत झालेला नाही. अचानक आलेल्या या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकरी तथा सामान्य नागरिकांची चांगलीच धांदल उडाली. 


शासन मायबापाने त्वरित पंचनामे करून झालेल्या केळी बागायातीची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांनी केली.


व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


या बातमीचे प्रायोजक आहे.

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 


सहप्रायोजक आहे.  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

أحدث أقدم