Khandesh Darpan 24x7

किसान सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या सभापतीपदी अतुल नेमाडे तर उपसभापती पदी रमेश येवले बिनविरोध

 



प्रतिनिधी :  राहुल  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी



सावदा येथील किसान सहकारी दूध उत्पादक संस्था मर्यादित, येथे चेअरमन (सभापती) व व्हा. चेअरमन (उपसभापती) निवडीसाठी सभा पार पडली. या सभेत अतुल रामदास नेमाडे यांची चेअरमन पदावर तर रमेश तोताराम येवले यांची व्हा. चेअरमन पदावर बिनविरोध निवड करण्यात आली, ज्यामुळे संस्थेच्या कामकाजाला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. 



या निवड प्रक्रियेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी वासुदेव पाटील यांनी यशस्वीपणे भूमिका पार पाडली. सभेला सोसायटीचे सर्व संचालक मंडळ सदस्य उपस्थित होते. संचालक मंडळामध्ये निलेश अच्युत (फेगडे), घन:श्याम भंगाळे, भोजराज चौधरी, भूषण चौधरी, लतेश चौधरी, महेश चौधरी, रमेश इंगळे, विनोद जावळे, अर्चना नेमाडे, स्वप्नील पाटील, अक्षय सरोदे, नीलिमा चौधरी, नीलिमा राणे, धर्मदास बैरागी यांचा समावेश आहे. संस्थेचे सचिव व सर्व कर्मचारी वर्ग यांनी निवड प्रक्रियेसाठी परिश्रमपूर्वक सहकार्य केले.





या निवडीनंतर नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. या निवडीमुळे संस्थेच्या कार्यक्षमतेत भर पडेल आणि दुग्धव्यवसायात नवे क्षितिज गाठले जाईल, अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली आहे.



या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

أحدث أقدم