Khandesh Darpan 24x7

शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्षपदी अफसर खान -- सावद्यात जंगी स्वागत



प्रतिनिधी :  राहुल  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


शिवसेना (शिंदे गट) अल्पसंख्यांक महाराष्ट्र प्रदेशच्या कार्याध्यक्षपदी मुक्ताईनगर येथील प्रखर सामाजिक व राजकीय कार्यकर्ते अफसर खान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सावदा येथील सोहेल खान यांच्या निवासस्थानी आयोजित विशेष समारंभात त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. या नियुक्तीमुळे पक्षाला अल्पसंख्यांक समाजामध्ये अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.




कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना अफसर खान म्हणाले, "शिवसेना (शिंदे गट) नेहमीच अल्पसंख्यांक समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. काही जणांनी पक्षाविषयी गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला असला, तरी शिवसेनेने मुस्लिम समाजासह सर्व अल्पसंख्यांकांच्या अनेक समस्या सोडवल्या आहेत. समाजातील प्रत्येक प्रश्न माझ्याकडे नि:संकोचपणे आणा, मी ते सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल."



"आ. चंद्रकांत पाटील आणि सईद खान यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी पात्र ठरून अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर संवेदनशीलतेने काम करेल. शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी मी माझ्या पूर्ण क्षमतेने प्रयत्न करीन."



या स्वागत समारंभाला शिवसेना जिल्हाप्रमुख समाधान महाजन, सावदा शहर प्रमुख सुरज सिंह परदेशी, सोहेल खान, अकबर खान, सादिक मिस्तरी, शेख कमरुद्दीन, अफजल खान, लतीफ तडवी, अरमान तडवी, साबीर तडवी, मोहसीन खाटीक, शेख अदनान, अमजद खाटीक, मोईन खान, शेख अल्लारखा, अकरम खान, शेख साजिद यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. सर्वांनी अफसर खान यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.



या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 




पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

أحدث أقدم