Khandesh Darpan 24x7

आषाढीसाठी 1542 कर्मचारी, राेज 120 टन कचरा उचलणार ‎: नगरपालिकेची यंत्रणा सज्ज

नगरपालिकेची यंत्रणा सज्ज-- यात्रेसाठी येणारे भाविक व स्थानिकांच्या आरोग्याची काळजी



खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -   (पंढरपुर )





आषाढी शुद्ध एकादशी निमित्त येणाऱ्या भाविकांच्या व स्थानिक नागरिकांच्या आरोग्य सुरक्षितेच्या व स्वच्छतेच्या दृष्टीने आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपालिका प्रशासन सज्ज आहे. यात्रा काळात स्वच्छतेसाठी १५४२ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून रोज १२० टन कचरा उचलण्यात येणार आहे.


आषाढी यात्रा कालावधीत महिलांच्या स्वच्छतेच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरामध्ये वेगळ्या शौचालयांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच नदी पात्र, वाळवंट परिसर, वाखरी पालखी तळ, ६५ एकर व इतर विविध ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापन करण्यात येत असून कक्षाच्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन वेडींग मशिन बसविण्यात येणार आहेत. शहरातील सार्वजनिक बोअरवेल, हातपंप आदी ठिकाणच्या पाण्याची तपासणी करण्यात आली आहे.तसेच दररोज पिण्याच्या पाण्याची क्लोरीन टेस्ट केली जाणार आहे.





आषाढी यात्रा कालावधीत शहरासह नदी पात्र, वाळवंट ,६५ एकर परिसर ,पत्रा शेड, प्रदक्षिणा मार्ग, मंदीर परिसर, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणच्या स्वच्छतेसाठी जवळपास १५४२ स्वच्छता कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून यामध्ये नगरपरिषद पंढरपूर चे ३४८ कायम कर्मचारी तर जवळपास १००० हंगामी कर्मचारी तसेच जिल्ह्यातील इतर नगरपालिकेकडून जिल्हा प्रशासनामार्फत १९४ कर्मचारी स्वच्छतेसाठी नेमण्यात आले आहेत. 



यात्रा काळात यात्रेकरुंच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाकडुन ६५ एकर, नदी पात्र, पत्राशेड, मंदिर परिसर, वाखरी पालखी तळ आदी ठिकाणी आपत्तीव्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे . त्याचबरोबर पत्राशेड, वाळवंट, रेल्वे मैदान या ठिकाणी तात्पुरते शौचालय उभारण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी रोकडे यांनी दिली. नदीपात्रात व घाटावर अखंडित व पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी नदीपात्रात १३ हायमास्ट पॉइंट्स, घाटांवर २०० वॅटचे एलईडी दिवे लावण्यात आले आहेत. तसेच सार्वजनिक शौचालयातही लाईटची व्यवस्था करण्यात येत आहेत. शहरात ठाकरे चौक, विसावा, भाई राऊळ चौक, कॉलेज चौक, संत गाडगे बाबा चौक, ६५ एकर इत्यादी ठिकाणी सौंदर्यीकरण कलाकृती उभारण्यात येत आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.



२ वेळेस कचरा संकलन पंढरपूर शहरात ठिकठिकाणी जंतनाशक फवारणीसह, मँलेथॉन पावडर, ब्लिचिंग पावडर वेळोवेळी टाकण्यात येत आहे. घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत डम्पिंग ट्रॉल्या, कॉम्पॅक्टर, कंटेनर, घंटागाडी, जेसीबी, जेटींग आदी वाहनांच्या माध्यमातून कचरा गोळा करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यात्रा कालावधीत या घंटागाड्या सकाळी व रात्री अशा दोन वेळेस घरोघरीचा कचरा गोळा करतील. दररोज ५५ ते १२० टन इतका कचरा उचलण्याचे नियोजन करण्यात आले आहे.


नदीपात्रात १३ हायमास्ट पॉइटस


या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



 सौजन्य : दै.दिव्य मराठी 


पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

أحدث أقدم