Khandesh Darpan 24x7

स्नेहमेळावा नव्हे, हा तर आयुष्यातील संस्मरणीय क्षण ठरला : ३६ वर्षांनंतर एकत्र आलेल्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया‎




निंभोरा प्रतिनिधी |  परमानंद शेलोडे 



न्यू इंग्लिश स्कूल निंभोरा या विद्यालयातील १९८८-८९ या बॅच च्या विद्यार्थी विद्यार्थिनी तब्बल ३६ वर्षानंतर स्नेहमेळाव्यात एकत्र आले. सुरुवातीला दिवंगत शिक्षक बारबंद सर, साहेबराव सर, फेगडे सर, जे.एस.पाटील, बी एम पाटील, आर.सी.चौधरी, महाजन सर व इतर दिवंगत शिक्षकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 


सर्व वर्गमित्र जुन्या आठवणींना उजाळा देत उत्साहात हा मेळावा पार पडला. एकमेकांना भेटल्यावर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अद्वितीय होता. यावेळी शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा पुनःप्रत्यय आला, तर काही विद्यार्थ्यांनी आपल्या यशोगाथा उपस्थितांसमोर मांडताना जुन्या दिवसांची आठवण करून दिली. 





हा स्नेहमेळावा म्हणजे केवळ एक कार्यक्रम नव्हता, तर आयुष्यातील एक संस्मरणीय क्षण ठरला, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. काहींनी शाळेतील प्रत्येक क्षण आजही मनात घर करून आहे. शिक्षकांचे मार्गदर्शन पुढेही उपयोगी पडते. अश्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. प्रसंगी उपस्थित शिक्षक वृंदांचे स्वागत आगळ्या वेगळ्या पद्धतीने केल्याने सर्व शिक्षक गहिवरले.


सूत्रसंचालन आरती पाटील हिने तर मनोगत छाया नेहते, दुर्गा गुजराती, नीलिमा भोगे, राजेश सरोदे, भूषण पवार, संजय चौधरी, गोविंदा वाणी, नथू पाटील यांनी व्यक्त केले तर आभार संगीता ठाकरे यांनी मानले. 


कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. स्वरूपा व्यवहारे, विजय निंभोरे यांनी प्रयत्न केले तसेच स्थानिक पातळीवर संतोष काटोले, किशोर बोरोले, मनीष दोडके यांनी मोलाचे योगदान दिले.




या बातमीचे प्रायोजक आहे.



सहप्रायोजक आहे.  

जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 








व्हिडीओ पाहण्यासाठी  व्हिडीओ क्लिक करा.


जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ   तथा  सर्व  सोयींनी  सुसज्य 



  



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

أحدث أقدم