कर्मच जीवनाचा मुख्य आधार आहे. दसनूर येथे वार्षिक बक्षीस वितरण समारंभ निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना निंभोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिदास बोचरे यांनी आपले मत व्यक्त केले.
दसनूर येथील उमेश्वर माध्यमिक विद्यालयात वार्षिक बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक एस. एस. बारूदवाले होते. प्रसंगी उमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डी. व्ही. चौधरी, सहसचिव संजय महाजन, संचालक मनोज महाजन, माजी मुख्याध्यापक एस. एम. चौधरी, पोलीस पाटील दीपक चौधरी, माजी पर्यवेक्षक बी. जे. तायडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जी. महाजन पर्यवेक्षक आर. एल. तायडे प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती अर्चना महाजन आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि मान्यवरांचे स्वागत विद्यालयातील मुख्याध्यापक यांनी गुलाब पुष्प देऊन केले. प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीसांसोबत भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानाच्या उद्देशिकेची एक प्रत भेट म्हणून देण्यात आली.
कार्यक्रमात बोलताना गीतेतील कर्म सिद्धांताचा दाखला देत बोचरे म्हणाले, आपले कर्म हाच आपल्या जीवनाचा मुख्य आधार आहे. परीक्षेत कोणतीही दैवी शक्ती आपली मदत करत नाही. तुम्ही केलेला अभ्यासच तुम्हाला उपयोगी पडतो . तुम्ही विद्यार्थी आहात अभ्यास करणे हेच तुमचे कर्म आहे. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. अभ्यासामुळेच तुम्ही चांगल्या गुणांनी यशस्वी होऊ शकता.
ते पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले ध्येय निश्चित करून ते प्राप्तीसाठी कठोर मेहनत करून यशाचा एक एक टप्पा पार करावा आणि आपले ध्येय गाठावे. अलीकडच्या काळात सोशल मीडियावर विद्यार्थी आपला अमूल्य वेळ वाया घालवताना दिसतात त्यांनी त्यापासून लांब राहून मोबाईल प्रलोभनांपासून देखील दूर राहणे आवश्यक आहे. या गोष्टींमुळे आपले मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊन आपले जीवन उध्वस्त होऊ शकते.
त्याचप्रमाणे सोळा-सतरा या वयात विद्यार्थी विद्यार्थिनींचे विचार परीपक्व झालेले नसतात. चांगले काय!!, आणि वाईट काय!! याची त्यांना जाण नसते. त्यांना पुरेसा जीवनाचा अनुभव नसतो. अशा वयात काही शारीरिक आकर्षणाचे शिकार होऊन पळून समाजाला तसेच आपल्या पालकांना न जुमानता लग्न करतात. पुढे त्यांना जेव्हा आपली चूक कळते. त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. जीवनात त्यांना कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागते. म्हणून असे कृत्य करणे योग्य नाही. आपल्या उज्वल भविष्यासाठी विद्यार्थ्यांनी चांगले शिक्षण घ्यावे व सुजाण व सुसंस्कृत नागरिक बनावे असे मोलाचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस. एस. पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन एम. टी. पाटील, एस. ए.पाटील, ए. आर. पाटील, मनीषा चौधरी यांनी केले. आभार सोनाली महाजन मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.




















إرسال تعليق