मनवेल ता.यावल | प्रतिनिधी
'प्रधानमंत्री जन आरोग्य' व राज्यातील महत्वाकांक्षी 'महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य' योजने च्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना विविध आजारांवरील शस्त्रक्रियांसाठी पाच लाखांपर्यंत मोफत उपचार मिळतो. या योजनेचा जनतेला लाभमिळावा, यासाठी ग्रामीण भागात 'आशा स्वयंसेविकांनी' घरोघरी जावून लाभार्थ्यांना 'गोल्डनकार्ड' काढून देत आहे.
गोल्डन कार्ड व आभा कार्ड चे लाभार्थी दारीद्रय रेषेखालील व केशरी रेशन कार्ड धारक असून पाढरे कार्ड धारकांना सुद्धा लाभ मिळत असून रेशन कार्ड ऑनलाईन करणे गरजेचे आहे.
'आयुष्मान भारत व गोल्डन कार्ड' मोबाईल द्वारे काढले जात आहे. साकळी प्राथमिक केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मुकेश चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली गट प्रर्वतक चित्रा जावळे, लीना पाटील आशा स्वयंसेविका गेल्या महिन्याभरा पासून सूक्ष्म नियोजन करून गावपातळीवर लाभार्थ्यांपर्यंत पोचून लाभार्थ्यांचे आभा कार्ड व गोल्डन गोल्डन कार्ड काढुन देत आहे.
राज्य सरकारने दोन कोटी कार्ड लाभार्थ्यांना वाटप करण्याचे उदिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्यातील सर्व आरोग्य विभागातील यंत्रणा व आशा सेविकांमार्फत गृहभेटी व गावोगावी ग्रामपंचायत मध्ये शिबिरे आयोजित करून आभा व गोल्डन कार्ड काढण्यासाठी प्रयत्न करत आहे.
सर्वसामान्य नागरिकांना विविध आजारांवरील शस्त्रक्रिया करता याव्यात व त्यांना आरोग्य सेवेचा लाभ मिळावा यासाठी या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मोठ्या रुग्णालयात यावर लाभ देण्यात येत आहे. आशा स्वयंसेविका यांनी केलेल्या कामाचा रोज आढावा घेऊन कामाला वेग आला आहे.
श्री गणेश उत्सव मंडळा समोर आरोग्य विभाग अंतर्गत आभा कार्ड व गोल्डन कार्ड बद्दल जनजागृती करून जास्तीत जास्त लाभार्थ्याचे गोल्डन आणि आभा कार्ड काढण्यासाठी शिबिर आयोजित करून घरो घरी जाऊन लाभ देण्यासाठी आशा स्वयंसेविका परिश्रम घेत आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
या ठिकाणी आपला व्यवसाय द्विगुणीत करण्याची संधी मिळावा अगदी वाजवी दरात
संपर्क ९४२३१८९५७२, ८४८२९६०९२७, ९४२३९३८६५०
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.















إرسال تعليق