प्रतिनिधी | निंभोरा
रावेर तालुक्यातील निंभोरा येथील जिल्हा परिषद शाळा निंभोरा स्टेशन येथे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी मिनाक्षी विजयकुमार सोनार यांचा निरोप समारंभ व सत्कार सोहळा पार पडला.
यावेळी प्रशिक्षणार्थी शिक्षिका मीनाक्षी सोनार व शालेय मुलांना अश्रू अनावर झाले. आपल्या वर्षभराच्या कार्यकाळात त्यांनी मुलांना अभ्यासक्रमातील नवनवीन विविध उपक्रम व खेळ शिकवत आपलेसे केले होते. या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वसीम शेख होते.
यावेळी उपास्थितानी मीनाक्षी सोनार यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याबद्दल कौतुक केले आणि पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित गौतम कुर्रे व दिलीप खैरे यांनी विद्यार्थ्यांवर दिलेले संस्कार व प्रेम सदैव स्मरणात राहतील असे गौरवउद्गार व्यक्त केले.
मुख्याध्यापक विकास जनबंधू यांनी मिनाक्षी सोनार यांच्या शैक्षणिक कामातील प्रामाणिकपणा व विविध उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल यासाठी सतत असलेली जिद्द हे खूप कौतुकास्पद आहे. युवा प्रशिक्षणार्थी सहकार्याने केलेले कार्य आयुष्यभर विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहील असे विचार व्यक्त केले.
मिनाक्षी सोनार यांनी आपल्या मनोगतात ही शाळा कायम माझ्या स्मरणात राहील व सर्वांनी मला उत्तम सहकार्य केले त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त केले. विशेष बाब म्हणजे मिनाक्षी सोनार यांचे पणजोबा स्व. त्र्यंबक सोनार हे सेवानिवृत्त शिक्षक, आजोबा रमाकांत सोनार हे सेवानिवृत्त मुख्याध्यापक व काका दिपक सोनार हे उटखेडे शाळेत कार्यरत प्रभारी केंद्रप्रमुख आहेत. अशाप्रकारे शिक्षणाच्या पवित्र कार्याचा वारसा चौथ्या पिढीपर्यंत चालविण्याचे काम सोनार या करीत आहेत. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक सोमनाथ उघडे यांनी केले. यावेळी विद्यार्थी व पालकांसोबत व्यवस्थापन समितीचे सदस्य व रेखा महाले संगीता बिऱ्हाडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या शेवटी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या विविध स्पर्धा व खेळांच्या स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

















إرسال تعليق