प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा शहराची कन्या तथा येथील माजी नगरसेवक फिरोज खान हबीबउल्ला खान पठाण यांची सुपुत्री मेहेक फिरोज खान पठाण हिने शैक्षणिक क्षेत्रात घवघवीत यश संपादन करत आपल्या परिवारासह संपूर्ण सावदा शहराचा गौरव वाढविला आहे.
मेहेक हिने मास्टर ऑफ फार्मसी (M. Pharm) या पदव्युत्तर अभ्यासक्रमात औषध रसायनशास्त्र विभागातून ९.०६ सीजीपीए म्हणजेच ८५.८१ टक्के गुणांसह first class with distinction प्रथम श्रेणीत विशेष गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे. या कामगिरीमुळे तिला कॉलेज टॉपर होण्याचा मान मिळाला असून तिच्या यशाने सावदा शहराचे नाव अभिमानाने उंचावले आहे.
ही गुणवंत विद्यार्थिनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अंतर्गत कार्यरत असलेल्या फैजपूर येथील तापी व्हॅली एज्युकेशन सोसायटी संचलित लोकसेवक मधुकरराव चौधरी कॉलेज ऑफ फार्मसी येथे शिक्षण घेत होती. तिच्या या उत्तुंग यशाबद्दल सावदा व परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, समाजातील विविध मान्यवर, मित्रपरिवार व शिक्षकवर्ग यांच्याकडून शुभेच्छांचा ओघ सुरू आहे.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.

















إرسال تعليق