प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
नगरपालिका निवडणुकीसाठी पालिका कार्यालयाच्या बैठक सभागृहात (मिटिंग हॉल मध्ये) मतदान यंत्र मोहर बंद (सीलिंग) चे काम करण्यात आले. २४ बुथसाठी २४ कंट्रोल युनिट, ३१ बॅलेट युनिट असे एकुण ५५ युनिट तयार करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे यांनी दिली.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महसूल आणि नगरपालिका यंत्रणा कामाला लागली आहे. चिन्ह वाटपानंतर प्रचाराचा धुराळा उडाला आहे. राजकीय वातावरण कमालीचे तापले असून दुसरीकडे पालिकेच्या मिटिंग हॉल मध्ये मतदान यंत्र सील करण्याचे काम झाले. या ठिकाणी काही उमेदवार आले होते.
दोन दिवसांपूर्वी सर्व यंत्र मतदान केंद्र निहाय लावले होते. मतदान यंत्राची उमेदवारांचा प्रतिनिधी समोर साफ सफाई करण्यात आली. या प्रसंगी उमेदवारासह उमेदवारांचा प्रतिनिधींची उपस्थिती होता. मशीनवर उमेदवारांचे नाव व चिन्ह मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रावर प्रतिनिधींच्या उपस्थितीत सेव्ह करण्यात आले. उमेदवाराचे नाव, चिन्हाचे लेबल लावण्यात आले.
प्रत्येक केंद्रावर बॅलेट युनिट व एक कंट्रोल युनिट असणार आहे. मतदान यंत्र सिलींगसाठी ६ टेबल लावले होते. या कामासाठी २५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. यात नगरपालिका तथा महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश होता. मतदान यंत्र ने-आण करण्यासाठी ५ व्यक्ती होते. सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत काम सुरू होते. प्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी बबनराव काकडे उपस्थित होते. यंत्र सिलींगच्या कामासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना सकाळी चहा, नाश्ता, दुपारी जेवण देण्यात आले.
पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्व मतदान केंद्रांची पाहणी केली आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मतदान यंत्र सील केले आहे. सोमवारी मतदान केंद्रात कर्मचारी रवाना होतील. नियोजन अंतिम टप्यात आहे. शांततेत मतदान होण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. - बबनराव काकडे, निवडणूक निर्णय अधिकारी
त्याचप्रमाणे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, सावदा येथील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी पोस्टल मतदानाची प्रक्रिया दि. ३० नोव्हेंबर २०२५ रविवार रोजी सावदा नगरपालिका येथे सकाळी ११ ते ५ आयोजित करण्यात आली आहे. यासाठी सावदा येथे ११ मतदार आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त झालेले व प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदारसंघात उपस्थित राहू न शकणारे कर्मचारी तसेच विशिष्ट श्रेणीतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी हे पोस्टल मतदान घेण्यात येत आहे.
सावद्यातील स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे : राधाकृष्ण संकुल
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.











إرسال تعليق