प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
निवडणूक आयोगाच्या सूचनेवरून सावदा नगरपालिका निवडणूक २०२५ मधील प्रभाग क्रमांक ४ 'ब' मध्ये निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. दिनांक २५ नोव्हेंबर रोजी केलेल्या अपिलाचा निकाल उशिरा लागल्याने या प्रभागातील निवडणुकीला स्थगिती आली.
या स्थगिती झालेल्या प्रभाग क्र. ४ " ब" चा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीरही करण्यात आला असून नवीन निवडणूक कार्यक्रम असा असेल......
- ४ डिसेंबर रोजी नाम निर्देशन पत्र सादर करणे
- १० डिसेंबर दुपारी ३ वाजे पर्यंत नाम निर्देशन पत्र मागे घेणे
- ११ डिसेंबर रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करणे तथा चिन्ह वाटप करणे
- २० डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान तसेच
- २१ डिसेंबर रोजी मत मोजणी सकाळी १० वाजे पासून सुरू होणार
या प्रमाणे स्थगित झालेल्या प्रभाग क्रमांक ४ ब चा निवडणूक कार्यक्रम असणार असून प्रचार मोहीम शिगेला पोहोचत असताना अचानक या पत्रकामुळे सावदा शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान, या प्रभागात निवडणूक निर्णय अधिकारी विरुद्ध कोर्टात दावा दाखल झाल्याने निवडणूक स्थगित झाली असून निवडणूक होत असलेल्या इतर प्रभागाची निवडणूक ठरल्या प्रमाणे होणार असून मत मोजणी बाबत अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सावद्यातील स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे : राधाकृष्ण संकुल
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.











إرسال تعليق