पुणे जिल्ह्यात बिबट्या-मानव संघर्ष शिगेला:प्रशासनही अपयशी, अखेर हल्ल्यापासून संरक्षणासाठी महिलांनी बांधले गळ्यात खिळ्यांचे पट्टे!
खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
पुणे जिल्हा, विशेषतः शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गाव, बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे सध्या दहशतीच्या सावटाखाली आहे. बिबट्यांच्या हॉटस्पॉटमुळे ग्रामस्थ भयभीत झाले असून, शेती हेच उपजीविकेचे मुख्य साधन असल्याने शेतात जाणे त्यांना अनिवार्य आहे. मात्र, बिबट्याच्या संभाव्य हल्ल्यातून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ आता अनोख्या आणि प्रभावी उपाययोजना करत आहेत. बिबट्या सहसा मानेवर हल्ला करून शिकार करत असल्याने, महिलांनी आणि शेतकऱ्यांनी आपल्या जिवाचे रक्षण करण्यासाठी एक विचित्र पण गरजेचा मार्ग निवडला आहे.
जाहिरात : राधाकृष्ण संकुल, रावेर रोड सावदा (https://youtu.be/Ngpky2CVTWM) - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.
या संकटकाळात पिंपरखेड येथील महिलांनी थेट टोकदार खिळे असलेला पट्टा आपल्या गळ्यामध्ये घातला आहे. जसे पाळीव कुत्र्यांना बिबट्यांपासून वाचवण्यासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे घातले जातात, त्याच धर्तीवर शेतकऱ्यांनी आणि महिलांनी हा उपाय अवलंबला आहे. शेतात काम करताना बिबट्याने अचानक हल्ला केल्यास, मानेवर असलेल्या या खिळ्यांच्या पट्ट्यामुळे बिबट्याला गंभीर दुखापत होईल आणि त्याची पकड ढिली होऊन जीव वाचू शकेल, अशी त्यांची धारणा आहे. बिबट्याच्या हल्ल्यातून जीव वाचवण्याचा हा अगतिक आणि धाडसी निर्णय पुणे जिल्ह्यातील वाढत्या वन्यजीव-मानव संघर्षाची तीव्रता दर्शवतो.
जाहिरात : साई डेअरी आणि कोल्ड्रिंक्स (https://youtu.be/EWXxirDpWgQ) - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.
बिबट्याच्या हल्ल्यांमुळे होणारे वाढते मृत्यू पाहता, राज्य सरकार आणि वनविभाग ग्रामस्थांना सुरक्षा पुरवण्यात अपयशी ठरत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. बिबट्याच्या दहशतीतून जीव वाचवण्यासाठी आणि शेतीचे काम सुरू ठेवण्यासाठी, हतबल झालेल्या शेतकऱ्यांवर आता पाळीव कुत्र्यांप्रमाणे टोकदार खिळ्यांचे पट्टे गळ्यात घालण्याची वेळ आली आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आणि लाजिरवाणी असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांना स्वतःच्या संरक्षणासाठी असे धोकादायक आणि जुजबी उपाय करावे लागणे, हे लोकशाहीतील मूलभूत संरक्षणाच्या अपयशाचे प्रतीक आहे.
जाहिरात : प्रियंका इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर, दुर्गामाता चौक, सावदा (https://youtu.be/Vx4iGbBdZ2s) - जाहिरात पाहण्यासाठी यावर क्लिक करा.
बिबट्याचा हल्ला हा राज्य आपत्ती घोषित करावा- अमोल कोल्हे
यावर आता राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, ते म्हणाले, कबूतरांच्या बाबत मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक घेतली होती. पण इकडे बिबट्याने ५७ बळी घेतल्यानंतर सरकारला जाग आली. आम्हाला त्यासाठी रास्तारोको करावे लागले. आमची मागणी आहे की बिबट्याचा हल्ला हा राज्य आपत्ती घोषित करावा. तसे जर केरळ सरकार घोषित करत असेल मग आपल्या मुख्यमंत्र्यांना काय अडचण आहे? असा सवाल कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
तिघांचा जीव घेणाऱ्या नरभक्षक बिबट्या ठार
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे ग्रामस्थांच्या त्रासाला कारणीभूत ठरलेल्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. रात्री उशिरा गावामध्ये बिबट्याचा शोध घेत असताना, वन विभागाच्या पथकाला हा बिबट्या ड्रोनमध्ये दिसला. बिबट्याला पकडण्यासाठी प्रथम त्याला डार्ट मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो निशाणा चुकला. या अयशस्वी प्रयत्नामुळे बिबट्या अधिक सावध झाला आणि त्याने थेट वन विभागाच्या कर्मचाऱ्यांवर प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे परिस्थिती गंभीर बनली.
कर्मचाऱ्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी, शेवटी दोन शार्प शूटरने या बिबट्यावर तीन राऊंड गोळीबार केला, ज्यात तो बिबट्या जागीच ठार झाला. हा बिबट्या अंदाजे ६ वर्षे वयाचा नर जातीचा होता आणि त्याच्या नमुन्यांवरून व ठशांवरून हाच बिबट्या १३ वर्षीय रोहनचा जीव घेणारा नरभक्षक असल्याचे स्पष्ट झाले आहे. रोहनचा जीव घेतला होता त्या ठिकाणापासून केवळ ४०० मीटर अंतरावर या बिबट्याला ठार करण्यात आले. वन विभागाच्या या कारवाईमुळे पिंपरखेड परिसरातील दहशत काही प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.
या बातमीचे प्रायोजक आहे.
सावद्यातील स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे : राधाकृष्ण संकुल
सावद्यातील स्वामिनारायण नगर, रावेर रोड, एल आय सी बिल्डींग जवळील भाडे तत्वावर दिले जाणारे संकुल म्हणजे : राधाकृष्ण संकुल
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.













إرسال تعليق