Khandesh Darpan 24x7

सावदा: मत मोजणीच्या दिवशी नागरिकांना गैरसोय टाळण्यासाठी आठवडे बाजार सोमवारी



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


सावदा शहरात नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना होणारी गैरसोय टाळण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या रविवारी दिनांक २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याने, नेहमी असणारा रविवारचा आठवडे बाजारामुळे शहरातील आणि परिसरातील नागरिकांना अडचण येऊ नये यासाठी आठवडे बाजार सोमवार दिनांक २२ डिसेंबर रोजी भरवण्यात येणार आहे.



सावदा नगरपालिकेचे मुख्याधिकारी भूषण वर्मा यांनी आज माध्यमांशी बोलताना मतमोजणी संदर्भातील महत्त्वाची माहिती दिली. जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार, मतमोजणीच्या दिवशी नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी आठवडे बाजार सोमवारी आयोजित करण्यात येत आहे. यामुळे बाजारात येणाऱ्या शेतकरी, व्यापारी, आणि नागरिकांना मतमोजणी प्रक्रियेत सहभागी होता येईल आणि त्याचबरोबर त्यांची दैनंदिन खरेदी-विक्री देखील सुरळीत राहील.





महाराष्ट्रातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी २ डिसेंबर रोजी बहुतांश ठिकाणी मतदान पार पडले असून, काही प्रभागांमध्ये न्यायालयीन प्रक्रियेमुळे मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, जिल्ह्यातील सावदा नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ ब मध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. या प्रभागात २० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होईल. 



सावदा शहरात या निवडणुकीचा मोठा उत्साह दिसून येत असून, बाजार बदलाच्या निर्णयामुळे स्थानिक व्यापारी व नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त होत आहे. २१ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. ही मतमोजणी प्रक्रिया सहा फेऱ्यांमध्ये (राऊंड्स) पार पडेल. त्यासाठी सहा मतमोजणी टेबले तयार करण्यात आली असून, एकूण २४ मतदान केंद्रे (बूथ) आणि २७ ईव्हीएम मशीनांचा समावेश आहे. 



राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार ही प्रक्रिया पारदर्शकपणे राबवली जाईल, ज्यामुळे स्थानिक उमेदवार आणि मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. सावदा शहरातील नागरिक या निकालाकडे डोळे लावून आहेत.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



  

सहप्रायोजक आहे.  

  




विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.





Post a Comment

أحدث أقدم