सावदा प्रतिनिधी : पंकज पाटील
जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी सावदा पोलीस ठाण्याची वार्षिक निरीक्षण तपासणी करून कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी पोलीस ठाण्यातील विविध विभागांची पाहणी करत एकूण व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.
पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी पोलीस ठाणे व परिसराची पाहणी करून स्वच्छता, नीटनेटकेपणा तसेच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या मुद्देमालाच्या निर्गतीबाबत केलेल्या कार्याची प्रशंसा केली. तक्रारदारांना तातडीने न्याय मिळावा यासाठी शासनाने अंमलात आणलेल्या नव्या कायद्यानुसार दाखल होणाऱ्या गुन्ह्यांचा तपास ३०/६०/९० दिवसांत पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत यापेक्षा अधिक प्रभावी काम करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
वार्षिक तपासणीदरम्यान सावदा पोलीस ठाणे अंतर्गत कार्यरत असलेल्या पोलीस पाटलांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. यावेळी कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन, महिला व नागरिकांची सुरक्षितता, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर तसेच गोपनीय माहितीच्या संरक्षणाबाबत जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी कोणतीही संशयास्पद घटना किंवा व्यक्तीबाबत माहिती असल्यास तात्काळ ‘डायल ११२’ वर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.
याप्रसंगी मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. बडगुजर, सावदा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी विशाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमोल गरजे, राहुल सानप तसेच इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
| व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा |
![]() |
| विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा |
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.


















إرسال تعليق