Khandesh Darpan 24x7

महापालिका निवडणुकीत बंडखोरी… जळगावमध्ये भाजपकडून तब्बल २७ जणांची पक्षातून हकालपट्टी !

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही इच्छुकांनी उमेदवारी मागे न घेता बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. हे बंडखोर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले होते.




खान्देश  दर्पण  24x7 वृत्तसेवा -


महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या काही इच्छुकांनी उमेदवारी मागे न घेता बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. हे बंडखोर अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले असताना मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचे निदर्शनास आले होते. या गंभीर प्रकाराची दखल घेत भाजप नेतृत्वाने पक्ष विरोधी कारवाया करणाऱ्या तब्बल २७ पदाधिकारी व कार्यकर्त्यांची तडकाफडकी हकालपट्टी करण्याचे पाऊल गुरूवारी उचलले.



महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून करण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या नावाचा आणि पक्षाच्या प्रतिमेचा गैरवापर करत काही अपक्ष उमेदवार हे मतदारांची दिशाभूल करत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला होता. प्रचारादरम्यान संबंधित सर्व अपक्ष उमेदवार आणि त्यांचे समर्थक स्वतःला भाजपशी संबंधित असल्याचे भासवत असल्याने मतदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रक जारी करून पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट केली होती.



भाजपने ज्या उमेदवारांना अधिकृत उमेदवारी दिली आहे, त्यांच्या व्यतिरिक्त कोणताही उमेदवार पक्षाशी संबंधित नसल्याचे त्यांनी ठामपणे नमूद केले होते. तसेच, भाजपच्या नावाचा वापर करून प्रचार करणाऱ्या उमेदवारांनी दोन दिवसांच्या आत आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा कठोर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही दिला होता.






मात्र, या इशाऱ्यानंतरही संबंधित उमेदवारांकडून पक्षादेशाचे उल्लंघन सुरूच राहिल्याचे निदर्शनास आले. अखेर, गुरुवारी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी यांनी निर्णायक पाऊल उचलत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्या तब्बल २७ जणांची भाजपमधून हकालपट्टी करण्याचे आदेश जारी केले. संबंधितांचे भाजपमधील प्राथमिक सदस्यत्व तसेच सध्या भूषवत असलेली पदे काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 



या तडकाफडकी कारवाईमुळे भाजपमध्ये शिस्त राखण्याचा संदेश देण्यात आला असून, महापालिका निवडणुकीत कोणतीही गोंधळाची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी भाजप नेतृत्व ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण अधिकच तापले असून, भाजपच्या कठोर भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरू आहे.



भाजपमधून यांची हकालपट्टी


जितेंद्र भगवान मराठे, संगिता गोकूळ पाटील, हर्षदा अमोल सांगोरे, धनश्री गणेश बाविस्कर, गणेश दत्तात्रय बाविस्कर, रंजना भरत सपकाळे, कांचन विकास सोनवणे, प्रमोद शांताराम शिंपी, भरत शंकर सपकाळे, हिरकणी जितेंद्र बागरे, चेतना किशोर चौधरी, मयूर श्रावणी बारी, तृप्ती पांडुरंग पाटील, सुनील ज्ञानेश्वर पाटील, विकास प्रल्हाद पाटील, गिरीश कैलास भोळे, कैलास बुधा पाटील, हेमंत सुभाष भंगाळे, प्रिया विनय केसवानी, रूपाली स्वप्नील चौधरी, अंजू योगेश निंबाळकर, मयुरी जितेंद्र चौथे, जयश्री गजानन वंजारी, ज्योती विठ्ठल पाटील, उज्ज्वला संजय घुगे, दिनेश मधुकर ढाकणे, कोकिळा प्रमोद मोरे.




या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   



सहप्रायोजक आहे.  

  




विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.







Post a Comment

Previous Post Next Post