Khandesh Darpan 24x7

स्वामिनारायण मंदिरात शाकोत्सव संपन्न : जवळपास १००० भाविकांनी घेतले दर्शन

 

प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी





सावदा येथील श्री स्वामिनारायण मंदिरात शाकोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. जवळ पास १००० भाविकांनी या निमित्त येथील स्थित राधा कृष्णदेव हरिकृष्ण महाराज यांचे दर्शन घेतले. प्रसंगी स्वामिनारायण गुरुकुल सावदा चे अध्यक्ष स. गु. शास्त्री भक्तीप्रकाशदासजी यांची उपस्थिती होती. त्यांनी उपस्थित जनसमुदायाशी संपर्क साधत धर्माचे तथा संप्रदायाचे महत्व समजावून सांगितले. 





यावेळी आशिर्वचनात ते म्हणाले, "भगवंताचे दर्शन फक्त दोनच मिनिटे करा पण वैचारिक दृष्टीने भगवंतांच्या मूर्तीला आपल्या हृदया मध्ये उतारा, तसेच फक्त महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी येऊ नका, तर तो कोणत्या भावाने - हेतूने वाटप केला जात आहे त्याच अध्यात्म जाणून घ्या. रोजच्या दिनचर्येतून किमान १० मिनिटे भगवंताच्या दर्शनासाठी द्या आणि या मानव रुपी देहाचे कल्याण करा. त्याच प्रमाणे भगवान स्वामिनारायण यांनी शाकोत्सव सर्वसामान्य सद्गृहस्थासाठीचा एकत्र येऊन साजरा करण्याचा उत्सव आहे."


हि बातमी आपण वाचत आहात यांचे सौजन्याने 





प्रसंगी मंदिराचे कोठारी स. गु. शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदास, भंडारी स्वामी माधवप्रियदास, स. गु. शास्त्री स्वामी भक्तीप्रकाशदासजी, स. गु. शास्त्री स्वामी लक्ष्मीनारायणदासजी यांची उपस्थिती होती. विशेष बाब म्हणजे सावदा नगरीच्या नगराध्यक्षा रेणुका पाटील सोबत नगरसेवक वानखेडे कुटुंबीय राजेश वानखेडे, पत्नी रेखा वानखेडे, मुलगी सिमरन वानखेडे तथा नगरसेवक शाम अकोले, नगरसेवक सचिन बऱ्हाटे यांनी सकाळी ९ ते दुपारी १ पर्यंत कथा श्रवण पासून ते महाप्रसाद ग्रहण पर्यंत उपस्थिती लावली. 



सकाळी ९ ते १०:३० संताचे आशीर्वाचन संपन्न झाले. नंतर भगवंतास शाकोत्सवासाठी तयार करण्यात आलेल्या प्रसादाचा नैवेद्य धरविण्यात आला व आरती करण्यात आली. नंतर उपस्थित सर्व भाविकांना लहान पूर्ण वांग्याची लाल भाजी (सग्ग्या वांग्याची भाजी) व बाजरीची भाकरी असा पारंपरिक विशेष मेनू चा महाप्रसाद वितरित करण्यात आला. 



या शाकोत्सवासाठी सावदा तथा परिसरातील सर्व सत्संगी महिला पुरुषांनी मोलाचे सहकार्य केले व कार्यक्रम उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   






व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

أحدث أقدم