प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथील सुगंगानगर मध्ये नव्याने बांधकाम केलेल्या टुमदार प्रशस्थ अशा श्री नर्मदेश्वर महादेव, व श्री वरद हनुमान मंदिरात श्री शिव परिवार, श्री राम दरबार, श्री हनुमान जी तसेच श्री विठ्ठल रुक्मिणी या देवतांच्या दिव्यमूर्तींची उद्या पासून म्हणजे दि. १८ ते २० फेब्रुवारी २०२६ या तीन दिवशी भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या भव्य अशा प्रतिष्ठापने निमित्त मंदिर परिसर आकर्षक रांगोळी ने सजविण्यात आले असून विविध प्रकारच्या फुलांची आरास तथा विद्युत रोषणाई ने मंदिर सजवण्यात आले आहे.
हि बातमी आपण वाचत आहात यांचे सौजन्याने ![]()
याप्रसंगी
१) दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ वाजे दरम्यान शांतीपाठ, मातृकापूजन, गणपती पूजन, पुण्याहवाचन, श्रींना धान्याधीवास आदी, दुपारी २ ते ५ वाजे दरम्यान अग्निस्थापन, गृहपेठ स्थापन, सायंपूजन, आरती व प्रसाद, धान्याधीवास सायंकालीन पूजन आदी,
२) दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान वास्तु हवन, शालाकर्म, श्रींना पुष्पाधिवास, स्थापित देवतांचे हवन आदी, दुपारी २ ते ५ वाजे दरम्यान श्रींचे न्यासकर्म, स्थापित देवता पूजन,सायंपूजन, आरती व प्रसाद आदी,
३) दि. २० फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते १२ दरम्यान प्रातः स्थापित देवतांचे पूजन, श्रींना दशविधी स्नान, प्रासाद देवता प्रवेश, प्राणप्रतिष्ठाविधी, कलश व ध्वजारोहण, महापूजा व महाआरती
वरील तीनही दिवसांचे धार्मिक कार्यक्रम भुसावळ येथील प. पु. आचार्य किरण शुक्ल महाराज यांच्या पौरोहित्याखाली घेतले जाणार आहेत. हा धार्मिक मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा जवळपास ११ (जोडपी) दांपत्यांच्या सहभागाने संपन्न होणार आहे.
त्याचप्रमाणे
दि. १८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते १० या वेळात वाघोड ता. रावेर येथील भजनी मंडळ यांचे जागरण, भारुड व गवळण तसेच
दि. १९ फेब्रुवारी रोजी रात्री ८ ते १० या वेळात ह भ प संतोष महाराज वाघोडकर ता. रावेर यांचे प्रवचन आणि
दि. २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेला कलश स्थापना व ध्वजारोहण आणि ह भ प धनराज महाराज अंजाळेकर यांचे कीर्तन होणार असून संध्याकाळी ४ ते ७ दरम्यान महाप्रसाद चे आयोजन करण्यात आलेले आहे.
या मंदिराची उभारणी सर्व स्तरातील लोकसहभागातून करण्यात आलेली आहे. तरी या प्राणप्रतिष्ठा सोहळ्या च्या निमित्ताने सर्व सुगंगा तथा सावदेवासीयांनी आवर्जून हजेरी लावावी असे आवाहन सुगंगा वासीय नागरिकांनी केलेली आहे. या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमासाठी सुगंगानगर वासियांनी सहकार्य केलेले आहे.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
| व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा |
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |



















إرسال تعليق