Khandesh Darpan 24x7

श्री स्वामिनारायण मंदिर सावदा च्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त ग्रामप्रदक्षिणेचे आयोजन




प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


आज चैत्र शुद्ध प्रतिपदा या निमित्ताने श्री स्वामिनारायण मंदिर सावदा चे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदासजी यांनी हे आयोजन केले होते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण शहरवासीयांना शुभेच्छा व जनजागृती या उद्देशाने प्रेरित होऊन स्वामिनारायण संप्रदायामध्ये पंचवीस वर्षापासून ही गुढीच्या ग्रामप्रदक्षिणेची परंपरा आजतागायत सुरू आहे. 


हि बातमी आपण वाचत आहात यांचे सौजन्याने 





पारंपारिक पद्धतीने बैलगाडीवरती रथाचे स्वरूप देऊन ही गुढी त्यावर बांधली जाते. त्यावर स्वामिनारायण भगवंतांची प्रतिमा पारंपारीक वाद्य गुरव वापरुन हा रथ संपूर्ण शहरभरामध्ये ग्राम प्रदक्षिणाच्या स्वरूपात फिरवला जातो. ठिकठिकाणी हरिभक्त पुरुष व महिला या रथाचे पूजन करतात व स्वागत करतात. तथा शहरात चौका चौकात उभारलेल्या गुढ्याचे पूजन केले जाते. 






या मिरवणुकीमध्ये सामील सर्व महिलांना हळदीकुंकू दिले जाते. अशा पद्धतीने ही ग्राम प्रदक्षिणा संपूर्ण शहरातून वाटेत येणाऱ्या प्रत्येक देवस्थानाला भेट देणे व दर्शन घेवून परत पुन्हा मंदिरामध्ये येते. मंदिरामध्ये सत्संग सभा होऊन याची सांगता केली जाते. 





याप्रसंगी सत्संग सभेमध्ये शास्त्री स्वामी भक्तीप्रियदासजी यांनी उपस्थितांसमोर "समुद्रमंथन सुद्धा याच दिवशी झाले, पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला आणि पांडवांनी इंद्रप्रस्थ येथे आपली सत्ता स्थापन केली आणि त्यावेळी पासून युधिष्ठिर महाराजांनी जी कालगणना सुरू केली तो स्थापना दिवस म्हणजे गुढीपाडवा., त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्रांनी रावणावर विजय मिळविला आणि त्यांनी ज्या वेळेला अयोध्येमध्ये प्रवेश केला त्यावेळेस प्रभू रामचंद्रांच्या स्वागतासाठी संपूर्ण आयोध्या वासियांनी संपूर्ण नगर सजवून गुढ्या उभ्या करून प्रभू रामचंद्र यांचे विजयी स्वागत केले. म्हणजेच "वाईटावर सत्याचा विजय" तो दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि याच परंपरेच पालन आपण सुद्धा आज या ग्राम प्रदक्षिणेच्या माध्यमातून करिता आहोत." उद्बोधन केले व गुढीपाडव्याचे महत्त्व विशद करून गुढीपाडवा का साजरा केला जातो? गुढी का उभारली जाते? अशा विविध प्रश्नांची उत्तरे देऊन हरिभक्तांमध्ये प्रबोधन केले. 



यावेळी प्रसंगी उपस्थित सर्व संतांचे पूजन व स्वागत करून या सत्संग सभेला सुरुवात झाली. आज पुजारी स्वामी सत्यप्रकाशदास यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांचा वाढदिवस सुद्धा पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. सर्वांनी त्यांना शुभेच्छा अर्पण केल्या. 



प्रसंगी अक्षय तृतीया या पवित्र परवाला मंदिरामध्ये आपल्या पितरांच्या मोक्ष करिता घागर भरणे चा भव्य सोहळा साजरा केला जातो, हजारो घागरी भरल्या जातात त्याची सुद्धा घोषणा याप्रसंगी करण्यात आली. ज्यांना घागरी भरायच्या असतील त्यांनी दक्षिणा स्वरूप रक्कम रू. ३५१ मंदिरामध्ये जमा करून नाव नोंदवावे असे आवाहन सुद्धा मंदिराच्या वतीने सर्व हरिभक्तांना करण्यात आले. 



याप्रसंगी मंदिराचे कोठारी शास्त्री स्वामी स्वयंप्रकाशदास, शास्त्री स्वामी भक्तीप्रियदास, शास्त्री स्वामी विश्वप्रकाशदास, पुजारी स्वामी सत्यप्रकाशदास व भंडारी स्वामी माधवप्रियदास, त्याचप्रमाणे मंदिराचे ट्रस्टी चंद्रशेखर पाटील, डॉ. अजितकुमार पाटील, नंदकिशोर पाटील, धनंजय चौधरी, शिवाजी भारंबे व हरिभक्त पुरुष आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन तसेच आभार मंदिराचे ट्रस्टी नंदकिशोर पाटील यांनी केले.



या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   






व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 





Post a Comment

Previous Post Next Post