प्रतिनिधी | आमोदा
आमोदयातील लेवा श्रीराम मंदिराच्या पुनर्निर्माणासाठी गुरुवारी भूमिपूजन करण्यात आले. गुढीपाडव्याच्या दिवशी आयोजित या सोहळ्याला ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थित होती. २ मे २०२५ रोजी मंदिराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या जिल्हा बँक शाखेत शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली होती. त्यात मंदिराचे नुकसान झाले होते.
हि बातमी आपण वाचत आहात यांचे सौजन्याने ![]()
यावेळी ग्रामस्थांनी मंदिराचे पुनर्निर्माण करण्याचा निर्धार केला होता. त्यानुसार गुढीपाडव्याच्या दिवशी या पुनर्निर्माण कार्याची सुरुवात करण्यात आली. संतांच्या हस्ते पूजा करून मंदिराच्या पुढील दरवाज्यावर भव्य ध्वज लावण्यात आला. महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
आचार्य स्वरूपानंद महाराज, शास्त्री स्वामी अनंतप्रकाशदासजी, धनराज महाराज, महामंडलेश्वर पवनदास महाराज, आचार्य मानेकर बाबा, महंत कन्हैयादास महाराज उपस्थित होते. यावेळी जनार्दन महाराजांनी "पुरुषार्थ हाच हिंदू धर्म आहे. मंदिर नवीन व्हावे ही देवाची इच्छा होती. आमोदयाचा सौंदर्य वाढवण्यासाठी हे मंदीर महत्त्वाचे ठरणार आहे. त्यासाठी भव्य असे मंदिर तयार करा." असे मार्गदर्शन केले. मंदिराच्या पुनर्निर्माणामुळे गावाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
पाच जोडप्यांच्या हस्ते पूजा
या धार्मिक विधीत गावातील पाच जोडप्यांनी सहभाग घेतला सचिन चौधरी, कुंदन पाटील, नयन चौधरी, सचिन लोखंडे आणि ललित चौधरी यांनी पूजा केली.
प्रसंगी लेवा श्रीराम ट्रस्ट चेअरमन उमेश पाटील, सेक्रेटरी महेंद्र सरोदे, विश्वस्त मोहन लोखंडे, राजेंद्र पाटील, ललित महाजन, धनराज चौधरी, सचिन चौधरी, मिठाराम सरोदे, सुरेश महाजन, संदीप चौधरी, डिगंबर भारंबे, यांच्यासह गावातील मान्यवर, ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |


















Post a Comment