प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
इयत्ता 10 वी (एस.एस.सी.) बोर्ड परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थी आणि पालकांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता श्री आ.ग. हायस्कूल व श्री ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालय सावदा येथे आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यशाळेत
- ऑनलाईन नोंदणी कशी करावी?
- कर्जाचा भाग 1 आणि भाग 2 भरतानाची घ्यावयाची काळजी.
- महाविद्यालयांचे पसंती क्रम कसे निवडावे?
- प्रवेशासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे. त्याचप्रमाणे
- तज्ञ मार्गदर्शकांकडून शंका निरसन
याचे सखोल असे मार्गदर्शन मिळणार असून इयत्ता अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया कशी सोपी होणार या दृष्टीने दृष्टिक्षेप टाकला जाणार आहे.
तरी जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी तथा पालकांनी या कार्यशाळेला हजर राहावे असे आवाहन श्री आ.ग. हायस्कूल व श्री ना.गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक पी.जी. भालेराव तथा वरिष्ठ लिपिक अतुल सपकाळे आणि कनिष्ठ लिपिक श्रेयश जैन यांनी केले आहे.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |











إرسال تعليق