प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथील ‘ब्राम्हण हितवर्धिनी समिती’ च्या वतीने भगवान परशुराम जन्मोत्सव शहरातील गचके दत्त मंदिरात उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. भगवान परशुराम हे भगवान श्रीविष्णूंचे सहावे अवतार मानले जातात. प्रसंगी भगवान परशुराम यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. "भगवान परशुराम हे केवळ शस्त्रधारी नव्हते, तर ते वेद-पुराणांचे जाणकार आणि न्यायाचे पुरस्कर्ते होते."
यानिमित्त प्रतिमापूजन, महाआरतीचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी मंत्रोच्चार करीत पादुकापूजनही केले. तसेच भगवान परशुराम यांच्या नावाचा जयघोष करीत संपूर्ण परिसर दणाणून सोडला. यावेळी सामूहिक रामरक्षा पठण करण्यात आले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ब्राम्हण हितवर्धिनी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रम समापन्न वेळी उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. तसेच या पावन समयी जळगाव येथून प्रकाशित होणारे अजय डोहळे संपादित ब्रह्मदंड या मासिकाच्या भगवान परशुराम जन्मोत्सव विशेष अंकाचे सावदा ब्राह्मण हितवर्धिनी समिती तर्फे प्रकाशन केले गेले.
कार्यक्रमा दरम्यान सावदा येथील बातमीदार जितेंद्र कुळकर्णी यांचा नुकताच जळगाव येथे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. जितेंद्र कुळकर्णी यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून नेहमीच समाजातील प्रश्नांना वाचा फोडली आहे. त्यांच्या या कामाची दखल जिल्हास्तरावर घेतली जाणे, हे अभिमानाची गोष्ट आहे. त्यामुळे या गौरवपूर्ण यशाबद्दल समितीच्या वतीने सुद्धा त्यांचा सत्कार करण्यात आला.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे :
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |











إرسال تعليق