प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
फेब्रुवारी २०२६ मध्ये घेतल्या गेलेल्या इयत्ता १२ वी च्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल दि. २ मे रोजी दुपारी २ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. त्यात सावदा शहरातील पालिका संचलित श्री आ.गं.हायस्कुल व श्री ना.गो.पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचा निकाल लागला असून निकाल खालील प्रमाणे -
१२ वी विज्ञान शाखेत
नेमाडे कुंजल अनिल हिने ६०० पैकी ५४५ गुण (९०.८३%) मिळवून प्रथम क्रमांक पटकावला तर
महाजन चेतन संजय याने ६०० पैकी ५२५ गुण मिळवून (८७.५०%) द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच
१२ वी कला शाखेत
मावळे मंदार उमाकांत याने ६०० पैकी ४४० गुण (७३.३३%) मिळवून प्रथम क्रमांक तर
तायडे हर्षाली भगवान हिने ६०० पैकी ३५० गुण (५८.३३%) मिळवून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.
१२ वी विज्ञान शाखेत एकूण १२८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते सर्वच १२८ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून विज्ञान शाखेचा १०० टक्के निकाल लागला तर कला शाखेत एकूण १०५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ३३ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून कला शाखेचा ३१.४२ टक्के निकाल लागला आहे.
दोन्ही शाखा मिळून एकूण २३३ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी १६१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. शाळेचा एकूण निकाल ६९.०९ % लागलेला आहे.
सर्व उत्तीर्ण तथा यशस्वी विद्यार्थ्यांचे सावदा न. पा. नगराध्यक्षा रेणुका पाटील, न. पा. शिक्षण समिती सभापती सचिन बऱ्हाटे, मुख्याधिकारी भूषण वर्मा, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व नगरसेवक, नगरसेविका यांनी अभिनंदन तथा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |






















إرسال تعليق