शालांत माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल आज दि. ०८ मे २०२६ रोजी दुपारी १ वा. ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. यात येथील नगरपालिका संचालित पीएमश्री ना.वि.ह. पाटील विद्यामंदिरचा ९१.५२ टक्के तर श्री आ.गं. हायस्कूल चा ८२.७५ टक्के निकाल लागला.
यात पीएमश्री नानासाहेब विष्णू हरी पाटील विद्यामंदिरच्या
स्वप्नाली रमेश वाणी हिने शेकडा ८८.६० गुण मिळवून प्रथम क्रमांक तर
आचल संजय ठोसरे हिने शेकडा ८७.४० गुण मिळवून द्वितीय क्रमांक आणि
विजया खुशाल सरोदे हिने शेकडा ८५.८० गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
शाळेचा एकूण ५९ विद्यार्थिनींपैकी पैकी ५४ विद्यार्थिनीं उत्तीर्ण झाल्या असून ९१.५२ टक्के निकाल लागला.
तर
श्री आ.ग.हायस्कूल व ना. गो. पाटील कनिष्ठ महाविद्यालया च्या
प्रतीक प्रकाश जोशी याने शेकडा ८४.८० गुण मिळवून प्रथम क्रमांक तर
अन्सारी मोहम्मद आवेश आसिफ याने शेकडा ८२.८० गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला.
शाळेचा एकूण ५८ विद्यार्थ्यांपैकी ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ८२.७५ टक्के निकाल लागला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सावदा पालिका नगराध्यक्षा, उपनगराध्यक्ष, शिक्षण सभापती, तथा सर्व सन्माननीय नगरसेवक-नगरसेविका, मुख्याधिकारी भूषण वर्मा, शाळेचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधूभगिनी यांनी अभिनंदन केले आहे.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |















Post a Comment