1991 मध्ये देशात आर्थिक सुधारणांची ऐतिहासिक सुरुवात करणारे डॉ. मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्ली एम्समध्ये निधन
खान्देश दर्पण 24x7 वृत्तसेवा -
देशाच्या आर्थिक सुधारणांचे पुरस्कर्ते माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. रात्री ८ वाजता त्यांना दिल्ली एम्समध्ये दाखल केले. येथेच रात्री ९:५१ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ९२ वर्षीय डॉ. सिंग दीर्घकाळापासून आजारी होते. केंद्र सरकारने त्यांच्या निधनानंतर शुक्रवारी सर्व सरकारी कार्यक्रम रद्द केले. शुक्रवारी सकाळी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील.
ते २००४ मध्ये देशाचे १३ वे पंतप्रधान झाले व मे २०१४ पर्यंत या पदावर दोन टर्म देशाचे ‘मन’ मौन राहिले. ते देशाचे पहिले शिख व चौथे सर्वाधिक काळ पंतप्रधान होते. मनमोहन यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबच्या (आता पाकिस्तान) चकवाल जिल्ह्यातील गह गावात झाला होता. फाळणीत त्यांचे कुटुंब भारतात आले. त्यांच्या पश्चात पत्नी गुरशरण कौर आणि तीन मुली आहेत.
भारत आपल्या सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक मनमोहन सिंह यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे. त्यांनी आर्थिक धोरणांवर मजबूत छाप सोडली. पीएम म्हणून लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले. – नरेंद्र मोदी, प्रधानमंत्री
पंतप्रधान देशाने दूरदर्शी नेता, अद्वितीय अर्थशास्त्रज्ञ गमावला. त्यांच्या आर्थिक उदारीकरणाने मध्यम वर्गियांचे कल्याण झाले. कोट्यवधी लोक गरीबीतून बाहेर आले. ते शब्दांपेक्षा कर्म करणारे व्यक्ती होते. - मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस अध्यक्ष
मनमोहन यांच्या साधेपणाने जग प्रभावित झाले होते. २०१० मध्ये टोरंटो येथे जी-20 शिखर परिषदेत अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणाले होते, मनमोहन यांनी केवळ भारतालाच नाही तर जगाला उत्तम नेतृत्व दिले आहे. ते भारताला विश्व शक्ती म्हणून पुढे नेत आहेत. जेव्हा डॉ. सिंग खास करून आर्थिक मुद्द्यांवर बोलतात तेव्हा जग त्यांना एकते.
ओबामा यांनी २०२० मध्ये स्मरणिका ‘अ प्रॉमिस्ड लँड’ मध्ये मनमोहन यांना असामान्य व्यक्ती असे लिहिले. ओबामांनी लिहिले, भारताच्या आर्थिक बदलाचे मुख्य आर्किटेक्ट मिस्टर सिंग हे नम्र टेक्नोक्रॅट असून त्यांनी भारतातील लोकांच्या भावनांना मूर्त रूप देत त्यांचा विश्वास जिंकला आणि त्यांचे जीवनमानही उंचावले.
शिंजो आबे मानत होते गुरु
जपानचे माजी दिवंगत पंतप्रधान शिंजो आबे हे डॉ. सिंग यांना आपले गुरु मानत होते. याचा गौप्यस्फोट आबे यांचे प्रमुख सहकारी तोमोहिको तानिगुची यांनी २०१४ मध्ये आबे यांच्या भारत दौऱ्यात केला होता.
मर्केल यांनी घेतला होता सल्ला
२०१३ मध्ये ग्रीक संकटावर चर्चेसाठी जर्मनीच्या तत्कालीन चान्सलर अँजेला मर्केल यांनी डॉ. सिंग यांचा सल्ला घेतला होता. त्यांनी जवळपास ४५ मिनिटे फोनवर भारतीय पंतप्रधानांशी चर्चा केली होती.
श्रद्धांजली... मोठ्या खुर्चीसाठी मी लहान माणूस असे म्हणायचे
मी डॉ. मनमोहन सिंग यांना २०१२ मध्ये त्यांच्या शासकीय निवासस्थानी ७ रेसकोर्सवर भेटलो. सुरुवातीलाच ते म्हणाले, ‘मोठ्या खुर्चीसाठी (पंतप्रधान) मी एक अत्यंत लहान माणूस आहे.’ सुमारे २८ महिने मी त्यांच्यासोबत काम केले. या दरम्यान मी त्यांच्याबद्दल जे ऐकले होते त्यांचा स्वभाव तसाच होता. अत्यंत प्रामाणिक, मृदूभाषी आणि साधेपणा. आर्थिक बाबींमधील त्यांच्याएवढा दूरदृष्टीचा व्यक्ती कुणीही नव्हता. सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी कटिबद्धतेबद्दल तर प्रश्नच नव्हता. त्यांचा दृष्टीकोन वास्तवता आणि आर्थिक उन्नतीचा होता. लायसन्स राज संपुष्टात आणून त्यांनी भारतीय बाजाराचे दरवाजे परदेशी गुंतवणुकीसाठी खुले केले.
उद्यमशीलता आणि नवोन्मेष हीच भारताची शक्ती आहे. केवळ संधी देण्याची गरज आहे. ते म्हणायचे, राजकीय विचारधारा ही जनतेच्या भल्यासाठी असते. केवळ विकास दराच्या आकड्यांवर नव्हे तर जनतेच्या आयुष्यात झालेला बदल आणि सामाजिक-आर्थिक न्याय यावर आर्थिक धोरणाचा पारख होते. त्यासाठी डॉ.सिंग यांनी राष्ट्रीय सल्लागार परिषदेची स्थापना केली.
मनरेगाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील कुटुंबांना १०० दिवस रोजगाराची हमी हे डॉ. सिंग यांचे ऐतिहासिक पाऊल होते. त्यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात कोट्यवधी गरीब कुटुंबे द्रारिद्र्यरेषेतून बाहेर आली. डॉ. सिंग म्हणायचे, गरीबी मी जवळून पाहिली आहे. १० पास झाल्यावर पुढील शिक्षणासाठी दुसऱ्या शहरात जाताना त्यांच्या काकांनी त्यांना नवीन बूट दिले होते. डॉ. सिंग यांच्या मते, शिक्षण आणि भोजन हक्काचा कायदा वंचितांचे आयुष्यात बदल घडवण्याच्यादृष्टीने पायाभरणी ठरणार आहे. डाॅ. सिंग यांच्या दृष्टीकोनामुळे भारत सदैव नव्या उंचीवर जाईल.
आणखी वाचा -- मनमोहन सिंग यांचा राजकीय प्रवास
या बातमीचे प्रायोजक आहे.
जाहिरात
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा.
जिल्ह्यातील सर्वात स्वस्त आणि अतिशय स्वच्छ तथा सर्व सोयींनी सुसज्य
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.













إرسال تعليق